Home अध्यात्म-विज्ञान ‘कॉस्मिक’ प्राणाचे महान सामर्थ्य

अध्यात्म-विज्ञान ‘कॉस्मिक’ प्राणाचे महान सामर्थ्य

by

Loading

अनेक प्रकारची भौतिक यंत्रे उपकरणे यांच्या माध्यमाद्वारे मनुष्य आपल्या तोंडातून उच्चारलेल्या शब्दांना वायुमंडळामध्ये प्रेषित करीत असतो. एकाच वेळी कितीतरी आकाशवाणी केन्द्रातून कितीतरी उच्चारित शब्दांचे क्षणाक्षणाला प्रेक्षेपण होत असते. टेलिफोन, टेलिव्हिजन सारखे दूरश्रव्य-दृश्य उपकरण इत्यादी यंत्रांच्या माध्यमाने शब्द व दृश्ये यांच्या लहरी वायुमंडळात प्रक्षेपित केल्या जातात. त्या लहरी दूर अंतरावर बसलेल्या लोकांना ग्रहण करून घेता येतात व ते शब्द व ती दृश्ये जशीच्या तशी ऐकता येतात, पाहता येतात. अशा प्रकारे या अनंत अंतरिक्षामध्ये सृष्टीच्या प्रारंभकाळापासून आजपर्यंतच्या दीर्घ अवधीत अनेक ऋषी, मनीषी यांनी संप्रेषित केलेले विचार एका अमूल्य संपदेसारखे सुरक्षित आहेत, विद्यमान आहेत. अनेक सूक्ष्म शरीर धारण करणारे आत्मे, प्रचंड संकल्पाचे धनी असलेले महामानव आपली वाणी व विचार भौतिक उपकरणांप्रमाणेच दुसऱ्या जिवंत मानवाच्या द्वारे प्रगट करू शकतात व त्यांना आवश्यक ती मुरड घालू शकतात. त्या सशक्त विचारांच्या द्वारे त्यांचे वैचारिक परिवर्तन करू शकतात, त्यांना आपल्याला अनुकूल करून घेऊ शकतात.

प्रख्यात परमाणूवैज्ञानिक जॉम्बिस मोनार्ड यांनी आपली पुस्तक “चान्स अॅन्ड नेसेसिटी” यात या विषयावर फार मोठे रहस्योद्घाटन केले आहे. ते लिहितात की भौतिक जगताशी संबद्ध असलेल्या बायोस्फीयर, स्ट्रॅटोस्फीयर या सारख्या पृथ्वीच्या भोवती आच्छादून असलेल्या परतींच्या शिवाय एक आणखी सूक्ष्म परत अशीच ब्रह्मांडाभोवती विस्तारलेली आहे. तिला “आइडिओस्फीयर” असे म्हणतात. त्यांचा निष्कर्ष असा आहे की या सूक्ष्म परतीमध्ये विचार संपदेचे अगाध भंडार भरलेले आहे. सृष्टीच्या प्रारंभापासून तर आजवरच्या काळापर्यंत घडलेल्या अनंत घटना, संशोधन, विचार प्रवाह, संस्कृतींचे उत्थान, पतन, विकास, विनाश या सर्वांचे सर्व तपशील या आइडिओस्फीयर मध्ये सूक्ष्म रूपात आजही विद्यमान आहेत. अनेक वैज्ञानिक संशोधनावरून हे सिद्ध झाले आहे की सशक्त विचार, घटना कधी समाप्त होत नाहीत. त्या सर्व अचेतन किंवा अज्ञात अशा ब्रह्मांडाच्या सूक्ष्म परतीमध्ये समाविष्ट होऊन जातात. विविध प्रकारच्या जीव धारण करणाऱ्या प्राणिमात्रांप्रमाणेच विचार देखील आपली वंशपरंपरा कायम ठेवण्यासाठी व त्यांचा विकास करण्यासाठी आतुर झालेले असतात. या प्रक्रियेमध्ये जेव्हा जेव्हा सहधर्मी विचारांचा आपसात ताळमेळ होतो, तेव्हा ते त्यापैकी जे जे अनुकूल असेल ते ते निवडून घेतात व अधिक सशक्त बनून घनीभूत होऊ लागतात.

जॉम्बिस मोनार्ड यांनी या गोष्टीचा विशेष उल्लेख केला आहे की ज्या विचारांची आवृत्ती जेवढी अधिक असेल तेवढेच ते अधिक समर्थ, सशक्त व सक्षम बनत असतात. त्यांच्या स्वरलहरी आइडिओस्फीयर मध्ये उपस्थित असतात व आपल्या प्रेरणा सतत संप्रेषित करीत असतात. या लहरी अनेक प्रकारच्या असतात व त्या सूक्ष्म वातावरणात प्रवाहित होत असतात. त्यांच्या सामर्थ्याचा कधीच लय होत नाही, क्षय होत नाही. त्यांच्या मतानुसार दूरानुभूती, पूर्वाभास, विचार संप्रेषण, विचार प्रहार, पदार्थांवर होणारा विचारांचा प्रभाव या सर्व अतीन्द्रिय शक्तीच्या मुळाशी ही विचारतरंगेच कारणीभूत असतात. विशिष्ट प्रकारे अभ्यास केल्यास या विचारतरंगांना सघन व केन्द्रित करता येणे शक्य असते. ही केन्द्रित करण्यात आलेली तरंगे फारच विलक्षण असल्याचा प्रत्यय येतो. ही प्रक्रिया पूर्णपणे विज्ञानाशी सुसंगत आहे. भारतीय अध्यात्म दर्शन, शास्त्रे, तत्त्वज्ञान व योगशास्त्र यांनी या विचारतरंगांना सघन व केन्द्रित करण्याच्या अनेक विधी व प्रक्रिया सांगितल्या आहेत. यांना धारणा, ध्यान, साधना, उपासना इत्यादी विधी द्वारे विकसित करता येऊ शकते.

विश्वप्रसिद्ध जर्मन विद्वान व विचारवंत हेकल यांनी “विश्वाच्या समस्या” या आपल्या पुस्तकात या विषयावर आपले श्रेष्ठ विचार व्यक्त केले आहेत. ते लिहितात की,

यूनिव्हर्सल लॉ व फंडामेंटल कॉस्मिक लॉ यांच्यानुसार मॅटर म्हणजे प्रकृती, फोर्स म्हणजे शक्ती, लाईफ म्हणजे प्राण, मन कॉन्शंस अहंकाराशी संबंधित आहेत. प्राण आकाशात राहतो. मन हे त्याचे उच्चतम विकसित रूप आहे. हे सर्व आकाशात स्थित आहेत व संपूर्ण ब्रह्मांडाचे व त्यातील सर्व पदार्थांचे व शक्तींचे नियंत्रण करीत असतात. मनुष्य आपल्या श्रेष्ठ विचार संपदेला सशक्त बनवून आपल्या सभोवतालच्या वातावरणावर त्याचा प्रभाव पाडून त्याला अनुकूल बनविण्यासाठी समर्थ होऊ शकतो. ग्रह, नक्षत्र व अदृश्य शक्ती यांच्या वाईट प्रतिकूल प्रभावाला थोपविण्यासाठी व्यक्तिगत भौतिक प्रयत्नाच्या तुलनेत सामुहिक आध्यात्मिक पुरुषार्थ व लोक कल्याणाच्या विचार लहरी, भावना व आस्था या अधिक सफल होऊ शकतात, समर्थ होऊ शकतात.

अखंड ज्योती

ऑक्टोबर 2009