147
विचारांच्या निर्भीड व निरहंकारी संत पीटर यांनी विरोधकांची यत्किंचितही पर्वा न करता स्पष्ट म्हटले की- “ईश्वर कोणत्या एका जातीचा पक्ष घेत नसतो, तर ज्या कोणत्या जाती किंवा जो कोणी मनुष्य त्याला भितो, त्यावर विश्वास व आस्था ठेवतो, ते सर्व त्याला प्रिय असतात आणि अशाच जाती अथवा मनुष्यास सद्धर्माचा उपदेश दिला जाऊ शकतो, जो त्यास प्राप्त करण्यास सर्वस्वी अधिकारी आहे.
असंतुष्टांना न भिता पीटरने धर्मसभेमध्ये उत्तर दिले, “बंधूंनो! मी जगातील सर्व जातींना उत्पन्न करणाऱ्या एकाच ईश्वरास मानतो. म्हणून माझ्या दृष्टीने कोणतीच जात अपवित्र नाही. एखाद्या जातीचे रीती-रिवाज भिन्न प्रकारचे आहेत, म्हणून ती जात ईश्वरीय उपदेशासाठी अपात्र ठरत नाही. पवित्र आत्म्याची छाया त्यांच्यावर देखील तशीच पडते, जशी तुम्हा आम्हावर पडते. “
अखण्ड ज्योती (मराठी)
ऑक्टोबर 2009