Home ईश्वरीय व्यवस्था

ईश्वरीय व्यवस्था

by

Loading

एक शिपाई सुट्टीवर घरी जायला निघाला. पत्नी व पोरांसाठी त्याने आपल्या ऐपतीनुसार काही वस्तू खरेदी करून सोबत घेतल्या. कच्च्या रंगाची साडी, कागदी खेळणी, गोड बत्ताशे इत्यादी अनेक वस्तू घेतल्या. वाटेत जोराचा पाऊस आला. त्यापैकी बऱ्याचशा वस्तू पावसाने भिजून वाया गेल्यासारख्या झाल्या. तो ईश्वराला दोष देऊ लागला, हे सर्व तुझ्यामुळेच झाले. थोडा वेळ हा पाऊस थांबला असता , मला घरी पोहचू दिले असते तर काय झाले असते ? थोडा पुढे गेला. तेवढ्यात त्याला काही दरोडेखोरांनी अडविले. त्यांना पाहून तो पळू लागला. त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. पण त्या पावसाने त्यांच्या गोळ्या भिजून बेकार झाल्या होत्या. त्यामुळे गोळ्या काही बंदुकीतून सुटू शकल्या नाहीत आणि तो शिपाई धावतपळत का होईना पण घरी सुखरूप येऊन पोचला. त्याने देवाला आभार मानीत आधी त्याला दिलेल्या दोषाबद्दल क्षमा मागितली. त्याला तो म्हणू लागला, “प्रभू, तुम्हीच मला वाचविले. मी तर अज्ञानी आहे. मला क्षमा करा.’

आपल्या भल्यासाठी ईश्वराने काय व्यवस्था करून ठेवलेली आहे हे आपणाला कळत नाही. आपण मात्र उगीच येता जाता त्याची तक्रार मात्र करीतच राहतो.

अखण्ड ज्योती (मराठी)

नोंव्हेबर 2010