देशरत्न डॉ राजेन्द्रप्रसाद आपल्या सांस्कृतिक मान्यतेचे मोठे समर्थक होते. एकदा त्यांच्या एका मित्राने विचारले “धर्माच्या नावावर आजपर्यंत कितीतरी लढाया लढल्या गेले आहेत, तेव्हा आपण धर्माचे खंडन करायला हवे, पण आपण तर सदैव त्याचे समर्थन करीत असता.” राजेंद्र बाबू हसले व त्याला म्हणाले “एक मनुष्य कुदळ घेऊन रस्ता खोदायला निघाला. लोकांनी त्याला विचारले तर म्हणाला- ‘या रस्त्यावर असंख्य • अपघात होत असतात, तेव्हा याला एकदाचे खोदून अपघातांचे मूळ कारणच मिटवून टाकतो.’ राजेंद्र बाबू मित्राला म्हणाले की आता आपण सांगा की त्या मनुष्याला आपण काय म्हणाल?” मित्र म्हणाला- “रस्ता खोदल्याने तर त्यावर चालणे सुद्धा कठीण होऊन जाईल. यापेक्षा योग्य तर हेच की लोकांना रस्त्यावर चालण्याचे नियम समजावून सांगावे आणि रहदारीच्या नियमांना आणखी जास्त सक्तीचे करावेत. “
देशरत्न डॉ राजेन्द्रप्रसाद म्हणाले – “मित्रा! तुझ्या प्रश्नाचे हेच उत्तर आहे. धर्माचरण हा मनुष्याला खऱ्या अर्थाने प्रगतिशील बनविण्यासाठी तयार केलेला मार्ग आहे. यावर चालण्याचे नियम म्हणजे सदाचरण व चांगल्या सवयी आहेत. या नियमांचा भंग केला की अपघात तर होणारच. पण यात दोष संस्कृतीचा नाही तर त्यात सांगितलेल्या आदर्शाचे पालन करण्यात होणाऱ्या चुकीचा आहे. तेव्हा हा मार्ग नष्ट करण्याचा विचार सोडून यावर कसे चालावे याचे नियम शिकविणे जास्त योग्य ठरेल. “
जून 2021 अखंड ज्योती (मराठी)