अत्री ऋषींच्या आश्रमात ज्ञानचर्चा सुरू होती. एका जिज्ञासूने विचारले भगवंताचे दर्शन घेण्यासाठी सर्व भक्त त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतात, पण शबरीमध्ये असे काय वैशिष्ट्य होते की भगवंत स्वतः तिच्या घरी गेले, एवढेच काय, तिचा मान वाढविण्यासाठी तिची उष्टी बोरेसुद्धा खाल्ली. अत्री ऋषी म्हणाले- शबरी ही भक्त नाही तर संत आहे. ती रात्री भजन व दिवसा परोपकारी कार्य करीत असते.
मातंग ऋषींच्या आश्रमात राहणाऱ्या लोकांना वेत्रवती नदीपर्यंत जाण्याचा मार्ग काट्यांनी भरलेला होता, तिने त्या मार्गाला झाडून स्वच्छ केले व तो निष्कंटक केला. ती नेहमी त्या मार्गाची साफसफाई करीत असे. भगवंत अशा भक्तांना सन्मान देण्यासाठी स्वतः त्यांच्या घरी जात असतात. खरे तर हेच आहे की भक्तांचे मूल्यांकन हे त्याच्या कर्माने केले जाते. केवळ कर्माचे अवडंबर दाखविल्याने, भक्तीचे प्रदर्शन केल्याने व दाखविण्यासाठी अर्चना केल्याने भगवंत प्राप्त होत नाहीत.
मे, 2021 : अखंड ज्योती ( मराठी )