138
श्रीमंतीच्या उद्धट अहंकाराचे प्रदर्शन जर आटोक्यात ठेवले तर इतरांना देखील धनकुबेर बनण्याची हाव डोईजड होणार नाही. सामान्य नागरिकासारखे जगणे म्हणजे काय मोठेपणाची नाचक्की होते ? पैसा व वेळ अनाठायी वाया घालविण्याची प्रवृत्ती म्हणजे काय मोठेपणाचे लक्षण आहे ? साधे जीवन अंगीकारले तर हा व्यर्थ खर्च होणारा पैसा वाचू शकतो. त्यापासून गोरगरिबांचा उद्धार होऊ शकतो. त्यांची आर्थिक समस्या दूर करता येऊ शकते. कुणावरही केविलवाण्या स्थितीत राहण्याची अगतिकता राहणार नाही.
– पं. श्रीराम शर्मा आचार्य
अखण्ड ज्योती (मराठी) सप्टेंबर 2008