आजची सर्वात महत्त्वाची गरज विचारक्रांतीचा व्यापक प्रचार-प्रसार हे या काळातील सर्वात मोठे व अत्यावश्यक कार्य आहे. वाईट व दुष्ट तत्त्वांशी तसेच राक्षसी व पशुवृत्तींशी संघर्ष केला जावा आणि मानवी गौरवानुरूप मर्यादांचे पालन व निषिद्ध बाबींपासून दूर राहण्याचे अनुशासन स्वीकारण्यास प्रत्येकास विवश केले जावे. नवयुगाच्या अवतरणाचा व सत्ययुगाच्या पुनरागमनाचा हाच एकमेव उपाय आहे. हा जगातील सर्व लोकांवर व क्षेत्रांवर लागू केला जावा. हीच आहे धर्म धारणा व सत्य, प्रेम व न्यायाची आराधना. यापेक्षा दुसरे मोठे कोणतेच पुण्य-परमार्थ असू शकत नाही. हेच ते महाभारत आहे, ज्याच्यासाठी महाकालाने प्रत्येक प्रखर प्राणवान व्यक्तीस हाक दिली आहे. हा मोर्चा जिंकताच उज्ज्वल भविष्याच्या निर्मितीमध्ये थोडी सुद्धा शंका राहणार नाही. एकविसाव्या शतकाची ज्ञानगंगा दुर्लभ राहणार नाही. प्रत्येकाला तिचा लाभ घेण्याची संधी मिळेल.
पुस्तक-एकविसाव्या शतकातील गंगावतरण लेखक- पं श्रीराम शर्मा आचार्य