Home योग्य मार्गावर चला, भटकू नका

योग्य मार्गावर चला, भटकू नका

by

Loading

चांगल्या उद्दिष्टाचे लक्ष्य गाठण्यासाठी आपला प्रवास नेटाने व अखंड चालत राहायला पाहिजे. थोडाफार थकवा आल्यास थोडी विश्रांती घ्यायला हरकत नाही. पण नेमलेल्या मार्गावरून मुळीच पळायला मात्र नको.

मार्गात कितीतरी अडचणी येतात, अडथळे येतात, मनाला ते भीती दाखवितात, भटकवू पाहतात, कधी काही प्रलोभन देऊ पाहतात. जंगलात जनावरांचा कळप वाटेल त्या मार्गाने भटकत राहतो. त्यांच्या चालण्याने पायवाट तयार होते. राजमार्ग सोडून या पायवाटेने जाणे सोपे जाईल, असे कुणाकुणाला वाटू लागते. कित्येकजण जवळचा सोपा रस्ता समजून त्या वाटेवरून जाऊ सुद्धा लागतात. पण त्याचा परिणाम उलट होतो. त्यांना अधिक त्रास होतो, थकवा येतो व मार्ग नीट न गवसल्यामुळे निराशा पदरी पडते.

अपूर्णतेतून पूर्णतेकडे निश्चित ठरलेल्या मार्गाने न थांबता सतत प्रवास करीत राहणे हेच उद्दिष्ट प्राप्त करण्याचे खरे साधन आहे.भटकंती करीत राहिल्यास थकवा व क्लान्ती याशिवाय काहीच पदरात पडत नाही. महान उद्देश गाठण्याचा ध्यास धरीत राहणे व अचल निष्ठा ठेवून सातत्याने मार्गक्रमण करीत राहणे, हाच उद्दिष्ट पूर्तीचा एकमेव उपाय आहे. वनातील जनावरांच्या रुळलेल्या पायवाटेने न जाता निश्चित संकल्प करून योग्य त्या राजमार्गाने विश्वास व निष्ठा बाळगून सातत्याने चालत राहायला पाहिजे. मार्गात येणाऱ्या अडचणींना पार करीत, उद्दिष्टा पर्यंत पोचण्यासाठी आपली ही प्रयाण साधना सातत्याने करीत राहणे अगत्याचेआहे. पं. श्रीराम शर्मा आचार्य फेब्रुवारी 2009 अखंड ज्योती ( मराठी )