141
एका जिज्ञासू व्यक्तीने ज्ञानी पुरुषाला प्रश्न विचारला जीवनाला अलंकृत करणारे देवता कोणत्या आहेत ? उत्तर मिळाले – “हृदय आणि जीभ.” दुसरा प्रश्न होता- जीवनाला नष्ट करणारे दैत्य कोणते आहेत ? पुन्हा तेच उत्तर मिळाले – “हृदय आणि जीभ”. खरे तर हृदयाची सहृयता किंवा निष्ठुरता हीच माणसाला महान किंवा पतित बनविण्यास कारणीभूत असते. जिभेच्या असंयमाने मनुष्य आपले आरोग्य व इतरांचा सहयोग गमावून बसतो तर मधुर व उपयुक्त संभाषणामुळे त्यास श्रेय आणि स्नेह या दोन्ही गोष्टी भरपूर प्रमाणात लाभत असतात.
अखंड ज्योती (मराठी)
मे 2021