Home स्टॅन फोर्ड

स्टॅन फोर्ड

by

Loading

कॅलिफोर्नियाचे प्रसिद्ध उद्योगपती स्टॅन फोर्ड यांना एकच मुलगा होता. त्यांच्या काही नातेवाईकांनी त्याचे अपहरण केले व त्याला मारून टाकले. त्याच्यामागे त्यांच्या मोठा कुटिल डाव होता. मुलाच्या दुःखाने स्टॅन फोर्ड हाय खाऊन मरून जाईल आणि मग आपण त्याची संपत्ती हडपायचा प्रयत्न करू शकू असा एकूण त्यांचा मानस होता. साहजिकच फोर्ड या घटनेने फार व्याकुळ झाले, दुःखी झाले. काही दिवसपर्यंत तर त्यांना काय करावे काही सुचेना. शेवटी एके दिवशी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. त्यांच्याजवळ सोने उत्पन्न करू शकणारी अत्यंत सुपीक अशी 6000 एकर जमीन होती. त्या जमीनीवर त्यांनी एक विश्वविद्यालय स्थापन केले. या विश्वविद्यालयात अनेक अध्यापकांना रोजगार तर मिळालाच पण गरीब विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करून या विश्वविद्यालयात त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची पुरेशी सवलत देण्यात येत होती. त्यांनी हे विश्वविद्यालय आपला पुत्र लीलॅन्ड याच्या स्मृतीदाखल बनविले होते. त्यांनी हे महान कार्य करून आपले व आपल्या पुत्राचे खऱ्या अर्थाने हित साधन करून घेतले. त्या क्षेत्रांत हे स्वावलंबनाच्या आधारावर उभे असलेले एकमेव वैशिष्ट्यपूर्ण ‘अ’ नामांकित विश्वविद्यालय आहे.

मे 2009

अखण्ड ज्योती (मराठी)