Home शालेय आरोग्याचे विज्ञान

शालेय आरोग्याचे विज्ञान

by

Loading

शाळेत शिकणाऱ्या मुलामुलींचे आरोग्य उत्तम राहवे यासाठी शाळेने स्वस्थ वृत्ताचे नियम पालन करणे आवश्यक आहे. मुलेमुली आठ तास विद्यालयातच राहतात. या ठिकाणी , त्यांची बुद्धी विकास पावते, त्यांचा मेंदू विकसित होतो म्हणून विद्यालयाचे वातावरण, सामाजिक पातळी व आरोग्याची व्यवस्था उत्तम रहायला पाहिजे. ही मुले देशाचे भावी नागरिक आहेत. त्यांचे शारीरिक मानसिक व चारित्रीक विकास घडणे जरूरीचे आहे.

विद्यालयाचे स्थान एकान्त जागी असावे. घनदाट लोकवस्तीच्या गर्दी मध्ये असलेल्या शाळांत शिकणाऱ्या मुलांचा नीट विकास होऊ शकत नाही. विद्यालयात हवा, ‘पाणी, प्रकाश भरपूर खेळता असावा, शौचालये, मूत्रालये पुरेशी असावीत. मळ निष्कासनाची चांगली व्यवस्था असावी. विद्यालयात शिकणाऱ्या मुलामुलींसाठी प्रत्येक वर्गात पुरेसे व्हेंटिलेशन असावे. खिडक्या पर्याप्त असाव्या. मुलामुलींसाठी , वेगवेगळी सोय करण्यात यावी. मधोमध एक मोठा हॉल असावा. विद्यालयाला लागून मोठे क्रीडांगण असावे. तिथे सर्व प्रकारचे खेळ खेळण्याची सोय असावी. शाळेत पुस्तकालय, वाचनालय देखील असावे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय असावी. प्रकाश पुरेसा असावा. मुलामुलींना दुपारच्या वेळी मध्यान्ह भोजनाची सोय असावी साफसफाई चांगली असावी. विद्यार्थ्यांना देखील यासाठी सामुहिक श्रमदान करण्याची व दर आठवड्याला शाळेचा परिसर साफ करण्याची प्रेरणा देत असावे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता व स्वयंसेवा करण्याची भावना उत्पन्न करायला पाहिजे.

प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी बसण्याचे डेस्क वेगवेगळे असावे. डेस्क किंवा टेबल यांचा पृष्ठभाग 15 व 45 डिग्री समोरच्या बाजून उतार येईल असा बनवावा. मेज व खुर्ची यांचे अंतर समान असावे. फार कमी नको, फार जास्त ‘नको, खुच्र्यांची व्यवस्था होण्यासारखी नसेल तिथे स्वच्छ

दरी किंवा साफ केलेली फरशी त्यावर बसायला पट्ट्या घालाव्यात. विद्यार्थ्यांना बसण्याची खरी पद्धती सांगितली पाहिजे. पाठीचा कणा व मान सरळ ताठ करून बसायला सांगावे. वाकून बसण्याचा सराव केला तर पाठीच्या कण्याचे अनेक रोग उद्भवू शकतात. आजकाल सर्व शाळांमध्ये ही व्यवस्था व हे नियम पाळण्यात येत असतात. सर्व शाळांनी त्याचे पालन करावे.

प्रत्येक विद्यार्थ्यांजवळ एक आरोग्य पुस्तिका असावी. नियमितपणे होणाऱ्या आरोग्य परीक्षणाची त्यात नोंद ठेवण्यात यावी. त्यांचा आहार, विहार, व्यायाम, बसण्याची पद्धती, टीका, औषध याविषयी चांगला व वेळोवेळी सल्ला त्यांना देत असायला पाहिजे व त्यांच्या पालकांना देखील त्याची पूर्ण माहिती द्यायला पाहिजे. विद्यालयाशी संलग्न डॉक्टर असावे. दंत विशेषज्ञ देखील असावे. निश्चित कालांतराने असे आरोग्याचे परीक्षण होत राहिले तर कुठली जीर्णव्याधी (क्रानिक डिसीज ) मुलांना शालेय जीवनात होऊ शकणार नाही. गळा खराब झाला, दुखू लागला, खोकला येऊ लागला तर औषध देऊन तो दाबविण्यात येतो. पण त्याचा प्रभाव हृदय, उदर, हृदयाचे व्हाल्व्ह यावर स्थायी रूपाने होऊ शकतो. म्हणून लहान आजाराची शंका आली तरी त्याच्या उपचाराची वेळीच सोय करण्यात यावी. एखाद्या बालकाला संक्रामक रोग झाला तर ती एक मोठी समस्या उभी राहते. याविषयी पूर्ण काळजी घेणे व प्रतिबंधाचे उपाय योजणे हे दोन्ही विद्यालयाचे प्रमुख व चिकित्सक या दोहोंचे कर्तव्य आहे. त्यासाठी सावधगिरी बाळगावी.

खेळांचे आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. मुले खेळणार नाहीत तर त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य दोन्ही चांगले राहणार नाही. योग प्रशिक्षण, ध्यान इत्यादींची सोय प्रत्येक विद्यालयात असायला हवी. मुलांना लहान वयातच आसन, बंध, मुद्रा, योगक्रिया सद्वृत्ताच्या नियमांना अनुकूल असे असायला पाहिजे. पौष्टिक आहार देऊ शकणारी मेस अवश्य असावी व तेथे मुलांना चांगले जेवण मिळण्याची व्यवस्था असावी.

ऑगस्ट 2009

अखंड ज्योती