Home ग्रंथाची गुणवत्ता

ग्रंथाची गुणवत्ता

by

Loading

महान साहित्यकार, संत, स्वामी करपात्रीजी महाराज यांनी ‘रामायण मीमांसा’ नावाच्या एका ग्रंथाची रचना केली. ग्रंथ प्रकाशनासाठी त्यांनी प्रेसकडे पाठवून दिला. पण बरेच दिवस होऊन गेले तरी ग्रंथ प्रकाशित झाला नाही, तेव्हा त्यांनी राधेश्याम खेमका यांना त्याचे कारण विचारले. त्यांनी उत्तर दिले, “महाराज! ग्रंथ तर केव्हाचाच तयार आहे; पण ‘लोकांची भावना अशी आहे की त्यावर आपले सुंदर चित्र छापल्या जावे. चित्र तयार होण्याला थोडा वेळ लागल्यामुळे ग्रंथ तयार होऊ शकला नाही.” त्यावर स्वामीजींनी लगेच त्यांचे खंडन करीत म्हटले, “हे बघा! अशी चूक करू नका. माझे हे पुस्तक भगवान श्रीरामांच्या पावन चरित्रावर लिहिल्या गेले आहे. त्यात माझे नाही, तर भगवान श्रीरामाचेच चित्र छापायला हवे. ” खेमकाजी म्हणाले, “ठीक आहे. आपली जशी इच्छा असेल, तसेच होईल.” काही क्षण मौन राहून पुन्हा करपात्रीजी महाराज म्हणाले, “संन्याशाला आपल्या प्रचार व प्रशंसेपासून दूर राहायला हवे. समाजासाठी चांगले विचार उपयोगी आहेत, माझे चित्र नव्हे. यावर भगवान श्रीरामांचे चित्र दिल्यानेच ग्रंथाची गुणवत्ता वाढेल.”

जून, 2021 अखंड ज्योती (मराठी)