आजचे हे जग भौतिकतावादी आहे, उपभोक्तावादी आहे. परम पूज्य गुरुदेवांनी ( पं श्रीराम शर्मा आचार्य ) म्हटले आहे की सर्व समस्यांच्या मुळाशी ही पदार्थों विषयी असलेली हाव, स्पर्धा हीच आहे. सर्वजण स्वार्थाच्या पूर्तीच्या मागे लागले आहेत. पदार्थांची संख्या, त्यांचा साठा हा मर्यादित आहे व त्याला हिसकावून घेऊ पाहणाऱ्या लोकांची संख्या अमर्याद आहे, अनन्त आहे, म्हणूनच काही लोकांना त्याचा लाभ होतो व जास्तीत जास्त लोक अतृप्त राहतात, बेचैन राहतात, इतरांशी ईर्षा करतात व मनात नेहमी तणाव बाळगून ठेवतात. त्यांना अंतरंगातील सुख म्हणजे काय याची जाणीवच नसते. ते प्राप्त करण्याची तर गोष्ट दूरच. अंतरंगात केवळ आसुरी शक्तींचाच वरचष्मा आहे. त्यांच्यापासून काय सुख लाभणार ? आत्यंतिक कामना, आत्यंतिक क्रोध, लोभ, स्पर्धा, आंधळी धावपळ, जगण्याची हाव हे सारे काही जीवनातील सुख शांती पासून माणसाला दूर घेऊन जातात. त्याला भटकवून लावतात. त्याच्या जीवनाची धूळधाण करतात.
*सत्ययुग हेच याचे समाधान*
याचे समाधान काय हे गुरुवर (पं श्रीराम शर्मा आचार्य) सांगतात. योगेश्वर कृष्ण देखील हेच सांगत आहेत. आपण प्रत्येकाने दुसऱ्यांचा सन्मान करायला शिकले पाहिजे. दुसऱ्यांच्या आत असलेले दिव्य स्वरूप पहायला शिकले पाहिजे. त्या वृत्तीची सतत वाढ करण्याचा प्रयत्न करीत रहायला पाहिजे. एकमेकांपेक्षा वरचढ होऊन हे करायला हवे. त्यापासून आपणाला तृप्तीचा आनंद लाभेल. यावरून हीच गोष्ट लक्षात येते की समाजात असे दिव्यकर्मी महात्मा लोक जेवढे जास्त प्रमाणात असतील त्याच प्रमाणात समाजात सर्वांना शांती तृप्ती लाभेल, तणावा पासून मुक्ती लाभेल, तो समाज प्रगतिशील होईल व आध्यात्मिक प्रवृत्तीचा होईल. अशा परिस्थितीत मग निश्चितच सत्ययुग अवतरेल व त्यात श्रेष्ठ माणसांचेच बाहुल्य असेल.
अखंड ज्योती पृष्ठ – 06 ऑक्टोबर 2009