Home समाज व राष्ट्र कल्याण

समाज व राष्ट्र कल्याण

by

Loading

आपलेे जीवन हे आपाल्याला समाजाने दिलेले आहे. ती आपली वैयक्तिक संपत्ती नसून, विराट विश्वाची आपल्याजवळ ठेवलेली एक ठेव आहे. त्याचा उपयोग समाज व राष्ट्राच्या कल्याणासाठी व त्यांच्या हितासाठीच व्हायला हवा. या तथ्याला व्यावहारिक रूपात तेव्हाच आणता येईल जेव्हा आपण असे समजू की आपले जीवन दुसऱ्यांसाठी झटून थोडे कष्टमय जरी झाले तरी दुसऱ्यांचे सुख-दुःख हेच आपले सुख-दुःख आहे. हा परमार्थ भाव ज्या मनुष्यात विकसित होतो, तो त्याच्या व्यक्तित्वास आकर्षक बनवितो हे आकर्षण एवढे जास्त असते की समाजाची शक्ती व त्या व्यक्तीच्या उन्नतीसाठी आवश्यक असणाऱ्या दुसऱ्यांच्या सद्भावना ह्या त्याकडे आपोआपच ओढल्या जातात. तेव्हा संपूर्ण समाज हा त्याचा स्वतःचा परिवार बनून जातो. ही एक अशी उपलब्धी आहे जी मनुष्याला कोणत्याही उंचीवर नेऊन पोहोचवू शकते.

पं श्रीराम शर्मा आचार्य

जून, 2021

अखंड ज्योती (मराठी)